Wednesday, June 10, 2026
Homeबल्लारपूरआ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा येथे संरक्षण भिंत व फूड कोर्टसाठी २...
spot_img

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा येथे संरक्षण भिंत व फूड कोर्टसाठी २ कोटी १९ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा येथे संरक्षण भिंत व फूड कोर्टसाठी २ कोटी १९ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; पोंभूर्णा विकासाला नवी गती

Jyotsna Wankhede : जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान २०२५-२६” अंतर्गत नगरपंचायत पोंभुर्णा हद्दीत दोन महत्त्वपूर्ण विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १२, श्री राजराजेश्वर नगर येथील सुमन मंगल कार्यालयाजवळील सार्वजनिक खुल्या जागेभोवती संरक्षण भिंत उभारण्याच्या कामास ६९ लक्ष ९८ हजार रुपये आणि नगरपंचायत पोंभुर्णा वार्ड क्रमांक १४ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील जुन्या फॉरेस्ट विश्रामगृहाच्या जागेवर आधुनिक फूड कोर्ट उभारण्याच्या कामास १ कोटी ५० लक्ष रुपयांची मान्यता दिली आहे. एकूण २ कोटी १९ लक्ष ९८ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.या कामांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्याला यश आले असून, पोंभुर्णा शहराच्या नियोजनबद्ध विकासाला नवी चालना मिळणार आहे.

या अंतर्गत प्रभाग क्रमांक १२, श्री राजराजेश्वर नगर येथील सुमन मंगल कार्यालयाजवळील सार्वजनिक खुल्या जागेभोवती संरक्षण भिंत उभारण्याच्या कामास ६९.९८ लाखांची मान्यता देण्यात आली आहे. या भिंतीमुळे सार्वजनिक जागेचे संरक्षण होऊन अतिक्रमणाला आळा बसणार असून, परिसराच्या सुव्यवस्थेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे.

तसेच, नगरपंचायत पोंभुर्णा वार्ड क्रमांक १४ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील जुन्या फॉरेस्ट विश्रामगृहाच्या जागेवर आधुनिक फूड कोर्ट उभारण्याच्या कामास १ कोटी ५० लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांचा संकल्प,पोंभुर्ण्याचा सर्वांगीण विकास

पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पुढाकार घेत विविध पायाभूत, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांना गती दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून फिश मार्केट व खुले नाट्यगृह, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर, नगरपंचायतची प्रशस्त इमारत, विश्रामगृह, श्री राजराजेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती, माळी  समाजासाठी सभागृह, आदिवासी वसतिगृह, वीर बाबूराव शेडमाके सभागृह, पत्रकार भवन, जिम तसेच पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या इमारती अशी अनेक विकासकामे साकारली आहेत.ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक विकास यांचा समतोल साधत पोंभुर्णा तालुका प्रगतीच्या नव्या उंचीवर झेपावत असल्याचे या प्रकल्पांमधून स्पष्ट होत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page