ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक : २७ मार्च २०२६ रोजी नगर परिषद चौक, बल्लारपूर येथे श्री रामनवमी निमित्त शहर काँग्रेस कमिटी, बल्लारपूर यांच्या वतीने आंब्याच्या पन्ह्याचे वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आयोजित करण्यात आले होते.
या पवित्र प्रसंगी मा. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, न. प. बल्लारपूर), मा. श्रीमती डॉ. रजनीताई हजारे (माजी नगराध्यक्ष), मा. श्री. डॉ. अनिल वाढई (संचालक, जि. म. सह. बँक, चंद्रपूर), मा. श्रीमती. छाया मडावी (माजी नगराध्यक्ष),
श्री. देवेंद्र आर्या (उपाध्यक्ष न. प. बल्लारपूर), श्री. अब्दुल करीम शेख (गटनेते व काँग्रेस शहर अध्यक्ष, बल्लारपूर), श्री. भास्कर माकोडे (नगरसेवक), श्री. इस्माईल ढाकवाला (नगरसेवक), अॅड. मेघा भाले (सभापती महिला व बालकल्याण समिती, न. प. बल्लारपूर), सौ. शिल्पा चूटे (उपसभापती महिला व बालकल्याण समिती, न. प. बल्लारपूर), सौ. वैशाली हुमने (नगरसेविका), सौ. मोना धानोरकर (नगरसेविका), सौ. सुनीता जिवतोडे (नगरसेविका), सौ. अंकू बाई (नगरसेविका), सौ. वैष्णवी जुमडे (नगरसेविका), यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात शहरातील मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका तसेच कांग्रेस कमेटीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवा निम्मित आयोजित या उपक्रमातून रामनवमीच्या पावन दिवशी सेवा, संस्कार आणि सामाजिक एकतेचा आदर्श संदेश समाजासमोर ठेवण्यात आला.