Wednesday, July 29, 2026
HomeParbhaniदिग्रस पाटी येथे श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात संपन्न.
spot_img

दिग्रस पाटी येथे श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात संपन्न.

दिग्रस पाटी येथे श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात संपन्न.

हजारो नागरिकांनी घेतला प्रसादाचा लाभ.

ज्योत्स्ना वानखेडे: दि. 26 श्रीराम नवमी निमित्त सेलू जवळ असलेल्या दिग्रस पाटी येथे प्रभू श्रीराम मंदिर असून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आहे. खूपसा, डिग्रस आणि पंचक्रोशीतील सर्व गावकरी भक्त मिळून हा जन्मोत्सव साजरा करत असतात.पूर्वी छोटे खानी होणारा कार्यक्रम आता अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू झाला. यामध्ये पंचक्रोशीतील भाविकांचा असणारा मोठा सहभाग कारणीभुत आहे. आज सकाळी दहा वाजता ह.भ.प. बापूसाहेब महाराज खवणे यांचे अतिशय सुंदर असे कीर्तन होते.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळ पासून पंचक्रोशीतील शेकडो महिला आणि पुरुष भाविक भक्त मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शनासाठी आणि कीर्तनासाठी सहभागी झाले होते. सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा आनंद घेतला. खुपसा आणि दिग्रस तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजय भैया डासाळकर,सेलू तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऍड.दत्तराव कदम, भारतीय जनता पार्टीचे सेलू तालुका अध्यक्ष गणेश काटकर, भाजपा कार्यकर्ते,प्रतिष्ठित व्यापारी लक्ष्मी मॉल चे मालक मधुकर नाना पौळ, प्राध्यापक, शिक्षक पत्रकार डॉ शिवाजी शिंदे आणि हजारो भाविक भक्तांनी परिसर गजबजून गेला. यावर्षी प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या पावन पर्वा निमित्त हभप बापुसाहेब महाराज खवणे यांचे काल्याचे  कीर्तनाचा सर्व महिला भगिनींनी व पुरुष मंडळींनी मोठ्या भक्ती भावाने आस्वाद घेतला. त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर आयोजित महाप्रसादास सेलू शहरासह पंचक्रोशीतील  हजारो नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त शिक्षक वसंत डासाळकर, विष्णू डासाळकर,महादेव खराबे, खुपसा आणि दिग्रस तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी  व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page