Tuesday, September 1, 2026
spot_img
HomeJanjagruti२९ मार्चला तेलंगणात प. पू. सद्गुरू दादाश्री महाराजांचा महासत्संग

२९ मार्चला तेलंगणात प. पू. सद्गुरू दादाश्री महाराजांचा महासत्संग

२९ मार्चला तेलंगणात प. पू. सद्गुरू दादाश्री महाराजांचा महासत्संग

सूक्ष्मध्यान साधना शिबीरासह आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन

Jyotsna Wankhede :
मुक्तेश्वरी गुरुपीठाचे प. पू. सद्गुरू दादाश्री महाराज यांच्या परम पावन सानिध्यात सूक्ष्मध्यान साधना शिबीर व महासत्संगाचे आयोजन रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी तेलंगणा विभागातील कवडाला येथील कन्यका परमेश्वरी सभागृहात करण्यात आले आहे. या आध्यात्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय व सकारात्मक वातावरण निर्माण होणार असून मोठ्या संख्येने साधक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता सूक्ष्मध्यान साधनेने होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत ध्यान सत्र पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत महासत्संग आयोजित करण्यात आला आहे. महासत्संगानंतर उपस्थित साधकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सद्गुरूंच्या सानिध्यात ध्यान साधना करण्याची संधी ही साधकांच्या जीवनातील प्रेरणादायी व आत्मिक समाधान देणारी अनुभूती मानली जाते. त्यामुळे तेलंगणा विभागातील सर्व साधक बंधू-भगिनींनी या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page