Thursday, April 16, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपुरात ईद मिलन सोहळा – सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा सुंदर संदेश
spot_img

बल्लारपुरात ईद मिलन सोहळा – सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा सुंदर संदेश

बल्लारपुरात ईद मिलन सोहळा – सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा सुंदर संदेश

ज्योत्स्ना वानखेडे:

बल्लारपुर येथे दि. १ एप्रिल २०२६ (बुधवार) रोजी जमाअत-ए-इस्लामी हिंद आणि मराठा सेवा संघ, बल्लारपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ईद मिलन सोहळा उत्साहपूर्ण आणि अत्यंत भावनिक वातावरणात संपन्न झाला. संत तुकाराम सभा गृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्य, परस्पर स्नेह आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. वाजिद अली खान होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. दिलीप चौधरी उपस्थित होते, तर मुख्य अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ. डॉ. अलका ताई अनिल वाढई यांनी कार्यक्रमाला गौरव प्राप्त करून दिला. याशिवाय मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष मा. सुरेश पंदिलवार तसेच जमाअत-ए-इस्लामीचे जिल्हा अध्यक्ष मा. अब्दुल रफीक कुरेशी यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठणाने झाली, ज्यामुळे वातावरणात आध्यात्मिकता निर्माण झाली. त्यानंतर जिजाऊ वंदनेद्वारे सांस्कृतिक समन्वयाचे सुंदर दर्शन घडले.

प्रस्तावनेत अब्दुल रफीक कुरेशी यांनी सांगितले की, “ईद मिलनसारखे कार्यक्रम समाजातील गैरसमज दूर करून परस्पर स्नेह आणि बंधुभाव वाढविण्याचे प्रभावी माध्यम आहेत.”

या प्रसंगी नगराध्यक्षा डॉ. अलका ताई वाढई यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा देत अशा संयुक्त उपक्रमांचे कौतुक केले आणि समाजातील ऐक्य अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

मा. सुरेश पंदिलवार यांनी “विविधतेत एकता” या तत्त्वावर मराठा सेवा संघ समाजसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांनी इस्लाममधील जकात व्यवस्था ही सामाजिक समतेचे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. वाजिद अली खान यांनी इस्लामचे मूलभूत तत्त्व—एकेश्वरवाद, प्रेषितत्व आणि परलोक—यावर प्रकाश टाकला. तसेच इस्लाम ही एक परिपूर्ण जीवनव्यवस्था असून शिक्षण, नैतिक मूल्ये, कुटुंब, समाज, अर्थकारण, न्याय व प्रशासन या सर्व क्षेत्रांत मार्गदर्शन करते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी उपस्थितांना कुरआनचा अभ्यास आपल्या भाषेत करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जावेद (वाजिद) खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवश्री नितीन वारारकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत सेवईंचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

या यशस्वी आयोजनासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद, यूथ मूव्हमेंट, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन, गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page