डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचन संस्कृतीचे प्रेरणा स्त्रोत आहेत – प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर
ज्योत्स्ना वानखेडे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथांवर जीवापाड प्रेम होते. त्यांनी पुस्तकांसाठी राजगृहाची उभारणी केली. १८ तास अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाचन संस्कृतीचे प्रेरणा स्त्रोत आहेत. असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब. गिल्डा सभागृहात रविवार ( दि.०५) रोजी आयोजित १८ तास वाचन उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, जयंती समितीचे अध्यक्ष सुबोध काकडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर म्हणाले की, ” वाचन ही जीवनातील मोलाची गोष्ट आहे. व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन पुरक आणि प्रेरक असल्याने संस्कारक्षम वयातच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागली पाहिजे. वाचन संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी १८ तास वाचन उपक्रमासारखे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे आहे.” असेही ते म्हणाले. १८ तास वाचन उपक्रमात सहा वर्षांची अनया आवटे, समृद्धी सोनकांबळे, सौरभी पांडव, स्वराज निवळकर, प्रणव काळे या विद्यार्थ्यांसह, गटकळ, पी.सी.एम.बी. अकॅडमी आणि शहरातील विविध शाळेतील १३५ पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन साळवे यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी संयोजक प्रा.प्रविण सोनवणे, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके , गंगाधर अवचार, सुमेध आवटे, मुक्तीराम वाव्हळे, दिपक सोनकांबळे, लक्ष्मण वाघमारे, पांडूरंग पाटणकर, अमित धापसे, विकास धापसे, विनोद धापसे, रूपेश भोवते, अरूण रामपुरकर यांनी पुढाकार घेतला.