Thursday, April 16, 2026
HomeParbhaniडॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे राज्यस्तरावर दैदिप्यमान यश.
spot_img

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे राज्यस्तरावर दैदिप्यमान यश.

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे राज्यस्तरावर दैदिप्यमान यश.

पाच सिल्व्हर तर एक ब्राँझ पदक.

ज्योत्स्ना वानखेडे:  नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू येथील विद्यार्थिनींनी डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा या अत्यंत मानाच्या आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या स्पर्धेत राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नूतन विद्यालया तील कु. धनश्री विलास शेळके व कु.आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी आपल्या बुद्धिमत्ता, जिज्ञासा,सातत्यपूर्ण अभ्यास आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या जोरावर रौप्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.तर संस्थेच्या बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या कु.सोळंके जीवन प्रभाकर, कु.सोनवणे स्नेहा पंढरीनाथ, कु.बिरादार तन्वी भीमराव या तिन्ही ही विद्यार्थिनीने सिल्व्हर मेडल पटकावले. देऊळगावकर आध्या भुजंग हिने ब्रांझ पदक पटकावले.ही स्पर्धा विद्यार्थ्यां मध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, निरीक्षणशक्ती, प्रयोगशीलता, तार्किक विचार क्षमता आणि सर्जनशीलता वाढवणे या उद्देशाने आयोजित केली जाते. राज्यभरातील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत असताना त्यातून पुढे येणे हे अत्यंत अभिमाना स्पद आणि कौतुकास्पद मानले जाते. अशा कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षेत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी मिळवलेले हे यश शाळेसाठी, पालकांसाठी आणि संपूर्ण सेलू शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या विविध टप्प्यांत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली.विज्ञान विषयातील सखोल समज, प्रयोगशील वृत्ती, प्रश्नांचे तर्कशुद्ध विश्लेषण आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले. या यशामागे विद्यार्थिनींची मेहनत, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासना ने नमूद केले.या यशासाठी शाळेतील विज्ञान विभागाने विद्यार्थ्यांना नियमित सराव,संकल्पनांची स्पष्टता, प्रयोगाधारित अध्ययन, प्रश्नसंचांचा अभ्यास,मार्गदर्शन वर्ग आणि प्रेरणादायी उपक्रम यांच्या माध्यमातून सक्षम तयारी करून घेतली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा जागृत ठेवत सातत्याने परिश्रम घेतले. परिणामी, या विद्यार्थिनींनी राज्यस्तरावर झळकणारे यश संपादन करून शाळेचा लौकिक उंचावला आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस. एम. लोया. उपाध्याय डी. के. देशपांडे, सचिव डॉ.व्ही. के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.भविष्यातही नूतन  विद्यालय शिक्षण संस्थेतील विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नूतन विद्यालय, सेलू हे विद्यालय केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, वैज्ञानिक, सामाजिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने कार्यरत असून या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला आणखी बळ मिळाले आहे. विद्यार्थिनींच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि वैज्ञानिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page