Wednesday, April 15, 2026
HomeParbhaniसेलू बाजार समितीत लवकरच हळद बीट सुरू होणार - सभापती डॉ. संजय...
spot_img

सेलू बाजार समितीत लवकरच हळद बीट सुरू होणार – सभापती डॉ. संजय रोडगे.

सेलू बाजार समितीत लवकरच हळद बीट सुरू होणार – सभापती डॉ. संजय रोडगे.

शेतकर्‍यांना दिलासा.

ज्योत्स्ना वानखेडे: दि.07  सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, लवकरच बाजार समिती अंतर्गत हळद बीट (हळद लिलाव प्रक्रिया) सुरू करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. या निर्णयामुळे सेलू तालुक्यातील हळद उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत हळद विक्रीसाठी शेतकर्‍यांना इतर बाजार पेठांकडे धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे वाहतूक खर्च वाढणे तसेच वेळेचा अपव्यय होणे अशा अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, स्थानिक पातळीवरच हळद विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकर्‍यांचा खर्च कमी होऊन त्यांना योग्य व स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार आहे. सदर बाजार समितीत यापूर्वी कापसाला चांगल्या दराने खरेदी होत असल्याने शेतकर्‍यांचा विश्‍वास आधीच दृढ झाला आहे. त्याच धर्तीवर हळद बीट सुरू झाल्यास बाजारपेठ अधिक सक्षम व गतिमान होईल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे.या उपक्रमासाठी बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे तसेच सर्व संचालक मंडळ सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. बाजार व्यवस्थापनाची आवश्यक तयारी, व्यापार्‍यांशी समन्वय आणि पायाभूत सुविधा उभारणी यावरही भर दिला जात आहे. तसेच सर्व व्यापारी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, हळद खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करावी. यामुळे बाजारात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन शेतकर्‍यांना अधिक चांगला दर मिळण्यास मदत होईल.शेतकरी व व्यापारी यांच्या परस्पर सहकार्याने हा उपक्रम निश्‍चितच यशस्वी ठरेल, असा विश्‍वास बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी व्यक्त केला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page