चतुरस्त्र सूर हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना

Jyotsna Wankhede:
भारतीय संगीतविश्वाला आपल्या स्वरांनी मोहिनी घालणाऱ्या, सुरांच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या आयुष्यात आनंद, वेदना आणि भावना जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असून, भारतीय संस्कृतीच्या आकाशातील एक तेजस्वी तारा, चतुरस्त्र सूर आज कायमचा लोप पावला आहे, अशा अत्यंत भावुक शब्दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे.
आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या एक युग होत्या. एक अखंड वाहणारी सुरांची गंगा होत्या. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये भावना जिवंत व्हायच्या, प्रत्येक सुरामध्ये जीवनाचा स्पंदन असायचे . त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या सुख-दुःखांना शब्द आणि स्वर दिले. त्यामुळेच त्यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे निधन नसून, एका संपूर्ण सांस्कृतिक पर्वाचा अंत असल्याची जाणीव मनाला चटका लावणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.










