न्यू हायस्कुल किनगाव च्या विध्यार्थ्यांनीची बॉक्सिंग स्पर्धेत गरुड झेप.
ज्योत्स्ना वानखेडे: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित,न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय किनगाव ता. फुलंब्री जि. छ. संभाजीनगर येथील इयत्ता 10 वी या वर्गात शिकत असलेली विध्यार्थिनी कु. अवंतिका रामकुष्णा केवट हिची भारतीय बॉक्सिंग संघात पदार्पण नागपूर येथे झालेल्या 17 वर्षीय बॉक्सिंग स्पर्धेत silver मेडल जिंकून भारतीय बॉक्सिंग संघात पदार्पण केल्या बद्द्ल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, कृषी पंडित श्री. बाळू भाऊ चव्हाण साहेब तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. माळी साहेब, उप प्रशासकीय अधिकारी श्री. श्रीखंडे सर, बॉक्सिंग चे कोच श्री.अर्जुन सकपाळ सर,क्रीडा शिक्षक श्री. खांडेकर सर मुख्याध्यापक श्री. जाधव.एम. एच.व सर्व शिक्षक, शिक्षकेतत्तर कर्मचारी तसेच शालेय समिती चे अध्यक्ष, सदस्य यांनी सर्वांनी विध्यार्थीनी ला पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशाबद्दल पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.