Wednesday, May 6, 2026
HomeRailwayभांदक रेल्वे परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन
spot_img

भांदक रेल्वे परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

भांदक रेल्वे परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

ज्योत्स्ना वानखेडे:
भांदक रेल्वे स्थानकाजवळ कि.मी. 852/8-12-A परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना 27 एप्रिल 2026 रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस चौकी बल्लारशाह येथे मर्ग क्रमांक 10/2026 अंतर्गत कलम 194 BNS प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑन ड्युटी दरम्यान सुरजकुमार गुप्ता यांनी सदर बाबत लेखी माहिती सादर केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित पुरुष मृत अवस्थेत आढळून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष दरम्यान असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
सदर मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन (PM) करण्यात आले असून 29 एप्रिल 2026 रोजी भद्रावती स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आले आहेत.
मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :
वय : अंदाजे 35 ते 40 वर्ष
अंगावर निळ्या रंगाचा टी-शर्ट (DXL साईज)
मिशी वाढलेली, दाढी वाढलेली, शरीरयष्टी सामान्य
या अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तसेच त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी त्वरित रेल्वे पोलीस चौकी बल्लारशाह येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page