Friday, July 3, 2026
HomeLekhरक्षकच बनले भक्षक? धाराशिव पोलिसांचा भन्नाट प्रताप! "फक्त सोनं चोरत जा..."
spot_img

रक्षकच बनले भक्षक? धाराशिव पोलिसांचा भन्नाट प्रताप! “फक्त सोनं चोरत जा…”

रक्षकच बनले भक्षक? धाराशिव पोलिसांचा भन्नाट प्रताप! “फक्त सोनं चोरत जा…”

तुम्ही ‘चोर-पोलीस’ खेळ नक्कीच खेळला असाल, पण धाराशिवच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये या खेळाचे वेगळेच नियम सुरू आहेत! हे वाचून तुमचाही संताप अनावर होईल…
नेमकं घडलं काय?
धाराशिव बस स्थानकावर संतोष टेकाळे यांच्या खिशातून गर्दीत चोराने ९ हजार रुपये लांबवले. पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेल्यावर पोलिसांनी तपास करण्याऐवजी चक्क ‘पुरावा’ मागितला! सामान्य माणूस असलेल्या संतोषजींनी स्वतः वणवण करून, एसटी अधिकाऱ्यांच्या पाया पडून CCTV फुटेज मिळवले.
चोराला पोलिसांची ‘VIP’ वागणूक!
फुटेज बघून पोलिसांनी चोराला फोन लावला (जणू तो त्यांचा रोजचाच ‘क्लायंट’!). चोर आला, त्याने ९ हजारांपैकी फक्त ३,३०० रुपये ‘रिफंड’ केले. बाकीचे पैसे कुठे गेले? देव जाणे! पोलिसांनी कोणतीही FIR न नोंदवता चोराला थेट क्लीन चिट दिली.
कहर म्हणजे साहेबांचा मोलाचा सल्ला: चोराला सोडताना साहेब त्याला म्हणाले, “तुझे कितने बार बोला, चोरी जरा देख कर कर.. सिर्फ सोना चोर..”
हा सर्व प्रकार संतोषजी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते, पण पोलिसांनी दादागिरी करत तो व्हिडिओही डिलीट करायला लावला.
रात्री चोरीचा माल वाटून घेण्याची ही नवी सिस्टीम आहे का? सामान्य जनतेने दाद तरी कोणाकडे मागायची? ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य फक्त नावापुरतंच उरलंय का?
 तुमचं यावर काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचेल!
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page