सेंट पॉल नर्सिंग कॉलेज, बामणी, बल्लारपूर येथे नर्सेस डे सेलिब्रेशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक : १२ मे २०२६ रोजी सेंट पॉल नर्सिंग कॉलेज, बामणी, बल्लारपूर येथे नर्सेस डे सेलिब्रेशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या विशेष कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, नगर परिषद बल्लारपूर) तसेच मा. डॉ. अनिल सदाशिव वाढई (संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांची विशेष उपस्थिती लाभली.
सेंट पॉल नर्सिंग कॉलेजचे संचालक-मा. श्री. अविनाश खैरे सर, प्राचार्या-मा. सोनाली पावडे मॅम, तसेच विभाग प्रमुख-मा. कोमल कळसकर मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात आधुनिक परिचारिका सेवेच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर मा. डॉ. अल्का अनिल वाढई व मा. डॉ. अनिल सदाशिव वाढई यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. डॉ. अल्का अनिल वाढई यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून नर्सिंग क्षेत्रातील सेवा, समर्पण, करुणा व मानवतेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक नृत्य सादरीकरण तसेच मान्यवरांच्या हस्ते गिफ्ट वितरण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला.