Wednesday, June 10, 2026
HomeChandrapurराजपत्र निघेपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे असहकार आंदोलन कायम , स्वतंत्र ओबीसी रकान्यासाठी...
spot_img

राजपत्र निघेपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे असहकार आंदोलन कायम , स्वतंत्र ओबीसी रकान्यासाठी प्रशासन सोबत बैठक संपन्न.

राजपत्र निघेपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे असहकार आंदोलन कायम , स्वतंत्र ओबीसी रकान्यासाठी प्रशासन सोबत बैठक संपन्न.  

ज्योत्स्ना वानखेडे:केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) स्वतंत्र रकाना नसल्याच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने असहकार आंदोलन पुकारले आहे, आज प्रशासनाने संघटनेला आज चर्चेला बोलावले होते 20 कलमी सभागृह येथे जिल्हाधिकारी वसुमता पंत यांचा सोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात करण्यात आली , अतिरिक्त जिल्हाधिकारी, तसेच ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात जनगणना प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाने संघटनेने पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच गावागावांत जनगणनेचे काम सुरळीत सुरू राहावे, यासाठी सहकार्याची विनंती केली. प्रशासनाच्या मते, ओबीसींची गणना पुढील टप्प्यात केली जाईल. मात्र, या आश्वासनावर संघटनांनी अविश्वास व्यक्त केला. ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी, स्वतंत्र ओबीसी नोंदणीशिवाय जनगणना स्वीकारता येणार नसल्याचे ‘आंदोलनात सहभागी व्हा’ ओबीसी जनगणना हा समाजाच्या भविष्यासाठीचा लढा आहे. अधिकारांसाठी जागृत झालेल्या ओबीसी समाजाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले स्पष्ट केले. २०२१ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद होईल, असे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यांनी ३१ ऑगस्ट २०१८ ला राजनाथ सिंह यांनी दिलेले आश्वासन आणि त्यानंतर संसदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही असे लोकसभेत विचारलेले प्रश्नावर उत्तर दिले होते . दिनांक २८ जून ला महामोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेने केले आहे बैठकीला यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामदास कामडी, अँड दत्ता हजारे, प्रा अनिल शिंदे, प्रा माधव गुरुनूले , श्रीहरी सातपुते,कविंद्र रोहनकर , पवन राजुरकर, सोनूने सर, अक्षय येरगुडे, मोरेश्वर सूरकर, रतन शिलावार,शंकर पाल, महिला महासंघाच्या शहराध्यक्ष मनस्वी गीऱ्हे, चंद्रपूर जिल्हा महिला महासंघाच्या महासचिव मनिषा बोबडे , नगरसेविका प्रतीक्षा येरगुडे उपस्थित होत्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page