Wednesday, June 24, 2026
HomeChandrapurडॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना भाजप चंद्रपूर महानगरतर्फे अभिवादन.
spot_img

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना भाजप चंद्रपूर महानगरतर्फे अभिवादन.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना भाजप चंद्रपूर महानगरतर्फे अभिवादन.

*Jyotsna Wankhede*:

भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ तसेच अखंड भारताचे पुरस्कर्ते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. आपल्या भाषणातून वक्त्यांनी डॉ. मुखर्जी यांच्या राष्ट्रहितासाठी केलेल्या त्यागपूर्ण कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाची एकात्मता, अखंडता आणि राष्ट्रवादाच्या विचारांना बळकटी देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. “एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे” हा त्यांचा निर्धार आजही राष्ट्रभक्तांना प्रेरणा देत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमास भाजप महानगर महामंत्री रविंद्र गुरनुले, सविता दंढारे, प्रदेश कार्यकारिणी परिषद सदस्य तुषार सोम, महानगर उपाध्यक्ष बलराम डोडाणी, गटनेता शेखर शेट्टी, दिनकर सोमलकर, कामगार झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष रामकुमार आक्कापेल्ली, प्रवीण गिलबिले, सुमित बेले, कार्तिक बोरेवार, अल्पसंख्याक महिला आघाडी अध्यक्षा कौसर खान, हेमलता खोब्रागडे, करण बैस, रीना साखरकर, भाग्येश्री येरणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page