Sunday, June 28, 2026
HomeChandrapur'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी समाजजागृतीचा संदेश दिला – आ. किशोर जोरगेवार
spot_img

‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी समाजजागृतीचा संदेश दिला – आ. किशोर जोरगेवार

मन की बातमधून पंतप्रधान मोदींनी समाजजागृतीचा संदेश दिला आ. किशोर जोरगेवार

मन की बात : मुस्लिम महिलांसोबतउपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद,

*Jyotsna Wankhede* : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय मन की बात कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचणे नंतर भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने मन की बात : मुस्लिम महिलांसोबत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा चंद्रपूर महानगर कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी शहरातील शेकडो मुस्लिम महिलांनी उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना उद्देशून केलेले मनोगत एकत्रितपणे ऐकले.

  यावेळी. भारतीय जनता पक्षाच्या महामंत्री सविता दंढारे, उपाध्यक्ष बलराम डोडाणी, विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, अल्पसंख्यांक महिला अध्यक्ष कौसर खान, नीलिमा वनकर, चित्रपट प्रकोष्ठ अध्यक्ष शक्ती धीराल, मंजुश्री कासनगोट्टूवार, अनिता झाडे, शाहीन शेख, हिना शेख, रुबीना शेख, नफिसा पठाण, हमीदा सय्यद आसिया शेख, शबनम शेख आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातकार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. कार्यक्रमानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित मुस्लिम महिलांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बातहा कार्यक्रम केवळ संवादाचा मंच नसून देशाला प्रेरणा देणारा उपक्रम बनला आहे. समाजातील सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आत्मनिर्भर भारत, ‘व्होकल फॉर लोकलआणि सामाजिक ऐक्य यांसारख्या विषयांवर सातत्याने जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या कार्यक्रमातून होत आहे.

ते पुढे म्हणाले, मुस्लिम महिलांचा आजचा उत्स्फूर्त सहभाग हा देशाच्या विकासामध्ये प्रत्येक समाजघटक समान भागीदार असल्याचा संदेश देणारा आहे. केंद्र सरकारने महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. समाजातील प्रत्येक महिलेला स्वाभिमानाने आणि सुरक्षित वातावरणात जगण्याची संधी मिळावी, यासाठी नरेंद्र मोदी सरकार सातत्याने कार्यरत आहे.

आमदार जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या विचारातून देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. अशा संवादात्मक कार्यक्रमांमुळे नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होतो असे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित मुस्लिम महिलांनीही मन की बातकार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील शेकडो मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page