Wednesday, July 1, 2026
HomeChandrapurचंद्रपूरातील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा औचित्याचा मुद्दा
spot_img

चंद्रपूरातील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा औचित्याचा मुद्दा

चंद्रपूरातील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा औचित्याचा मुद्दा

*Jyotsna Wankhede*: चंद्रपूर शहराजवळील मोरवा गावानजिक घडलेल्या अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले.

दि. २८ जून २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत शेजारी राहणाऱ्या ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीने अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, बालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद केले. राज्यात बालकांविरुद्ध वाढणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
या संदर्भात त्यांनी शासनाकडे पीडित बालिकेला तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार, मानसोपचार आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाचा जलदगती न्यायालयामार्फत खटला चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, शाळा व परिसरात बालसुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करणे, पालक व विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करणे आणि अशा घटना रोखण्यासाठी राज्यव्यापी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सभागृहात ठामपणे मांडले.
समाजातील निष्पाप बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, अशा अमानुष कृत्यांविरोधात शासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page