Tuesday, June 30, 2026
HomeChandrapurपडोलीतील चिमुरडीवरील अमानुष अत्याचार प्रकरण गंभीर, आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्र्यांकडे उज्ज्वल...
spot_img

पडोलीतील चिमुरडीवरील अमानुष अत्याचार प्रकरण गंभीर, आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्र्यांकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी.

पडोलीतील चिमुरडीवरील अमानुष अत्याचार प्रकरण गंभीर, आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्र्यांकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी.

*Jyotsna Wankhede*: चंद्रपूर शहरालगतच्या पडोली परिसरात पाच वर्षीय निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर झालेला हा अत्याचार हा केवळ एका कुटुंबावर झालेला अन्याय नसून संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी घटना आहे. अशा नराधमाला कोणतीही दया न दाखवता कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे या खटल्यात शासनाने विशेष लक्ष घालून प्रभावी कायदेशीर बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.

यावेळी त्यांनी पुण्यातील नसरापूर येथील भीमराव कांबळे प्रकरणाचा संदर्भ देत, त्या प्रकरणाप्रमाणेच चंद्रपूर प्रकरणातही तातडीने आणि निष्पक्ष तपास पूर्ण करून जलदगतीने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तपासामध्ये कोणतीही हयगय होऊ नये आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी, यासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच हा खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालविण्यात यावा, पीडित चिमुरडी व तिच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी तसेच निवासी वसाहतींमधील बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवून जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशीही मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

या अत्यंत संवेदनशील प्रकरणात पीडितेला तातडीने न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page