Sunday, July 12, 2026
HomeAmaravati*विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापूर येथील गैरप्रकारांची चौकशी; सहसंचालक तंत्रशिक्षण अमरावती यांचे आदेश*
spot_img

*विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापूर येथील गैरप्रकारांची चौकशी; सहसंचालक तंत्रशिक्षण अमरावती यांचे आदेश*

*विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापूर येथील गैरप्रकारांची चौकशी; सहसंचालक तंत्रशिक्षण अमरावती यांचे आदेश*

*उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्रिसदस्यीय समिती गठीत; १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश*

*ज्योत्स्ना वानखेडे*: दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित दारापूर येथील विक्रमशीला तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) संस्थेतील शैक्षणिक व प्रशासकीय गैरकारभाराची आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती (JDRO) चे प्र. सहसंचालक डॉ. व्हि. आर. मानकर यांनी एक उच्चस्तरीय त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर यांच्या कडक निर्देशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली असून या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

*काय आहे न्यायालयीन प्रकरण?*

विक्रमशीला तंत्रनिकेतन, दारापूर संस्थेतील विस्कळीत झालेल्या शैक्षणिक व प्रशासकीय बाबीं संदर्भात श्री. मोहित गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्र. ३०२१/२०२६ (पूर्वीची ३०२३) दाखल केली होती. या याचिकेवर २५ जून २०२६ रोजी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले.

संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व मागण्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित प्राधिकाऱ्यांनी योग्य ती कायदेशीर चौकशी करावी आणि पुढील सुनावणीच्या तारखेला म्हणजेच १६ जुलै २०२६ रोजी या चौकशीचा अंतिम अहवाल न्यायालयासमोर सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

*कर्मचाऱ्यांचे ‘आपले सरकार’ पोर्टलवर निवेदन*

दरम्यान, संस्थेतील कर्मचारी प्रतिनिधी श्री. दीपक शिरभाते व इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २५ जून आणि ७ जुलै २०२६ रोजी राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर थेट तक्रारवजा निवेदन सादर केले होते. चौकशी समितीने कोणताही अंतिम निर्णय किंवा अहवाल निश्चित करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सुनावणीची प्रत्यक्ष संधी द्यावी आणि लेखी निवेदन स्वीकारण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. या गंभीर बाबीची दखल घेत सहसंचालकांनी तात्काळ चौकशी समितीला या निवेदनावर नियमोचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

अशी आहे त्रिसदस्यीय चौकशी समिती:

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाने (JDRO) कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि स्वयंस्पष्ट अभिप्राय व शिफारशींसह अहवाल तयार करण्यासाठी खालील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे:

● अध्यक्ष: डॉ. ए. बी. बोराडे (प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती)

● सदस्य सचिव: डॉ. एस. पी. बुरघाटे (विभागीय प्रमुख, स्थापत्य विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती)

● सदस्य: डॉ. जी. जी. सराटे (विभागीय प्रमुख, अणूविद्युत विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती)

१० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे बंधन: या गठीत समितीला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय व शिफारशींसह चौकशी अहवाल दि. १० जुलै २०२६ पर्यंत सहसंचालक कार्यालयाला सादर करण्याचे कडक आदेश देण्यात आले होते.

*व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आदेश*

या चौकशीत कोणतीही बाधा येऊ नये म्हणून तंत्रशिक्षण सहसंचालकांनी श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव तसेच विक्रमशीला तंत्रनिकेतन, दारापूरचे प्राचार्य यांना या चौकशी समितीला संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध करून देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

न्यायालयाच्या पुढील १६ जुलैच्या सुनावणीत हा अहवाल सादर केला जाणार असल्याने, या समितीच्या चौकशीत संस्थेतील कोणते गैरप्रकार आणि कर्मचाऱ्यांचे कोणते प्रश्न समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page