*ज्योत्स्ना वानखेडे*
*दिनांक:* 12.07.2026 रोजी अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांच्या पथकाने खालीलप्रमाणे छापा टाकून कार्यवाही केली.
*1. आरोपींची नावे व पत्ता:*
1. *श्री. प्रसाद मारोती दुर्गे* – वय 48 वर्षे
2. *श्री. जीवन हगरूजी भैसारे* – वय 48 वर्षे
*पत्ता:* मातारदेवी रोड, गोयंका शाळेजवळ, लेबर कॅम्प, घुग्घुस, ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर
*गुन्हा:* स्वतःच्या राहत्या घरी सुगंधित पानमसाल्याची साठवणूक व विक्री करणे.
*2. जप्त केलेला मुद्देमाल व किंमत:*
1. *मुद्देमाल:* सुमारे 21.956 किलो पानमसाला – विमल, V1, राजश्री, डबल ब्लॅक इ. ब्रँड
2. *एकूण किंमत:* ₹40,935/-
*3. जप्तीचे कारण:*
शासनाने प्रतिबंधित केलेला *अन्नपदार्थ* बेकायदेशीरपणे साठवून ठेवणे व विक्री करणे.
*4. गुन्हा नोंद:*
आरोपींविरुद्ध *एफ.आय.आर. क्र. 0226/2026* दाखल करण्यात आला आहे.
*लावलेली कलमे:* भारतीय न्याय संहिता BNS चे कलम 123, 223, 274 व 275
*5. केलेली कार्यवाही:*
मा. श्री. के. आर. जयपूरकर, सहआयुक्त अन्न, नागपूर व मा. श्री. पी. ए. उमप, सहायक आयुक्त अन्न, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली
तसेच मा. आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार *अन्न सुरक्षा अधिकारी श्री. उमेश एम. कापगते* यांनी सदर कार्यवाही केली.
*6. विशेष बाब:*
एफ.आय.आर. मध्ये अशी नोंद घेण्यात आली आहे की, जर या आरोपींवर यापूर्वी एकापेक्षा जास्त असे गुन्हे दाखल असतील आणि या गुन्ह्यात आणखी इतर लोक सामील असतील तर या प्रकरणाचा तपास *MCOCA कायद्याच्या* तरतुदीनुसार करावा.