पोलीस ठाणे बल्लारपुर येथे दि. *27/06/2026* रोजी फिर्यादी *श्री राजवीरसिंह धनसिंह सनवाल*, वय-60 वर्षे, रा. शिवाजी वार्ड, बल्लारपुर जि. चंद्रपूर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात इसमांनी घरफोडी करून सोने, चांदी व इतर सामान असा एकूण *₹23,74,100/-* चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बल्लारपुर येथे *अप. क्र. 711/2026 कलम 331(4), 305 भा.न्या.सं.* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
*तपास व आरोपी निष्पन्न:*
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान बल्लारपुर पोलिसांनी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व गुप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून या गुन्ह्यातील *आरोपी क्र.01 रोहित कनाई मंडल*, वय 23 वर्षे, रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. व त्याच्या वयानुसार सांगितले की, मी व *शुभम उईके* याने मिळून सदरची घरफोडी केली आहे.
सदरचे आरोपी *क्र.02 शुभम जयसिंग उईके*, वय 23 वर्षे, रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर यास त्याच्या मोबाईल लोकेशनवरून मध्यरात्री चंद्रपूर येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.
वरील दोन्ही आरोपींनी चोरलेल्या मुद्देमालापैकी काही मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून वरील दोन्ही आरोपींना उर्वरित मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उर्वरित मुद्देमाल खालील व्यक्तींना विकल्याचे सांगितले.
या पाचही जणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी चोरीचा मुद्देमाल खरेदी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून चोरीचा खरेदी केलेला मुद्देमाल कायदेशीररित्या पंचासमक्ष जप्त करून सदर गुन्ह्यात योग्य त्या कलमांची वाढ करून कलम *03 ते 07* यांनी चोरीचा माल आहे हे माहित असूनसुद्धा खरेदी केल्याने त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.
अशा प्रकारे या गुन्ह्यात चोरीस गेलेला अंदाजे एकूण *₹21,00,000/-* चा मुद्देमाल वरील आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.
*कारवाई करणारे पथक:*
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक *श्री आयुष नोपानी* सो., मा. अपर पोलीस अधीक्षक *श्री ईश्वर कातकडे* सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी *श्री सुधीर नंदनवार* सा. यांच्या मार्गदर्शनाखाली