Tuesday, July 28, 2026
HomeGondpipari*पोलीस स्टेशन गोंडपिपरी ची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु विक्री करणा-या ईसमावर कारवाई करून...
spot_img

*पोलीस स्टेशन गोंडपिपरी ची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु विक्री करणा-या ईसमावर कारवाई करून २५,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*पोलीस स्टेशन गोंडपिपरी ची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु विक्री करणा-या ईसमावर कारवाई करून २५,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त* 

*ज्योत्स्ना वानखेडे*
दिनांक *१८/०७/२०२६* रोजी गोपनीय बातमीदार यांचे कडुन गोपनीय माहिती मिळाली की, मौजा फुरडी हेटी येथील संघराज केशव तेलसे हा आपले राहते घरी प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखुचा साठा करून त्याची विक्री करीत आहे. अशा माहिती वरून सदर ठिकणी जावुन पाहनी केली असता त्याचे राहते घरी एका रुममध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखु होला हुक्का चे *०१ किलोग्रॅमचे १४ सिलबंद पॉकेट* प्रती पॉकेट किंमत *१३२५/- रु* प्रमाणे *१८,५५०/- रु* व ईगल तंबाखुचे *४०० ग्रॅमचे ०८ पॉकेट* किंमत प्रत्येकी *८५०/- रु* प्रमाणे *६,८००/- रु* असा एकुण *२५,३५०/- रुपयाचा* प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु मिळुन आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मदतीने यातील आरोपी नामे *संघराज केशव तेलसे* वय *५० वर्ष* रा. फुरडी हेटी ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर याचेवर कलम *१२३, २२३, २७४, २७५ भा.न्या.सं.* सहकलम *२६(१), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a), ५९ अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही *श्री आयुष नोपाणी* पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, *श्री ईश्वर कातकडे* अप्पर पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, *श्री सत्यजीत आमले* उपविभागीय पोलीस अधिकारी सा. मुल, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गोंडपिपरी चे ठाणेदार *श्री रमेश हत्तीगोटे*, पो. हवा. *अनुप कवठेकर*, पोलीस अंमलदार *सचिन झाडे*, *सुनिल गव्हारे*, चालक सहा. फौ. *पुनेश्वर कुळमेथे*, यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page