Sunday, September 13, 2026
spot_img
HomeChandrapurमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने ‘देवाभाऊ जनकल्याण...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह

१५ ते २३ जुलै दरम्यान विविध जनकल्याणकारी उपक्रम, उद्या रविवारी भव्य आरोग्य शिबीर

*Jyotsna Wankhede*:

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने १५ ते २३ जुलै या कालावधीत ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात विधानसभा क्षेत्रात सामाजिक, आरोग्य, धार्मिक व जनहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, याबाबतची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

   यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरनुले, सविता दंढारे, तुषार सोम, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, प्रमोद शास्त्रकार, प्रविण गिलबिले आदींची उपस्थिती होती.

            यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजोपयोगी कार्यातून जनतेची सेवा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर विविध सेवा उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

            सेवा सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५६ ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच १९ जुलै रोजी भवानजीभाई शाळेत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला, औषधोपचार आणि विविध आजारांवरील विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

   याशिवाय जिल्हाभर ५६ महाआरत्या, ५६ योग शिबिरे, ५६ वृक्षारोपण कार्यक्रम आणि ५६ बुद्ध वंदना आयोजित करण्यात येणार आहेत. २२ जुलै रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, बाबूपेठ येथील अभ्यासिकेचे लोकार्पण, दिव्यांग नागरिकांना साहित्य वाटप, विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार तसेच महाशिवलिंग येथे महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जुलै रोजी सेवा सप्ताह यशस्वीपणे राबविणार्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून या उपक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

  पत्रकार परिषदेत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांनी या सेवा सप्ताहातील सर्व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा, आरोग्य सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सेवा सप्ताह आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page