Sunday, September 13, 2026
spot_img
HomeCompany*लॉयडस मेटल अँण्ड एनर्जी लि. एम.आय.डी.सी. घुगुस, जि. चंद्रपूर ...

*लॉयडस मेटल अँण्ड एनर्जी लि. एम.आय.डी.सी. घुगुस, जि. चंद्रपूर या प्रकल्पाद्वारे घातक वायु व जल प्रदूषण होत असल्यामुळे मानवी जिवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे प्रकल्पाची पर्यावरण रद्द करण्याबाबत.*

*लॉयडस मेटल अँण्ड एनर्जी लि. एम.आय.डी.सी. घुगुस, जि. चंद्रपूर   या प्रकल्पाद्वारे घातक वायु व जल प्रदूषण होत असल्यामुळे मानवी जिवाला धोका   निर्माण झाला असल्यामुळे प्रकल्पाची पर्यावरण रद्द करण्याबाबत.*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर  प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत में. लॉयडस मेंटल्स व एनर्जी लि. घुगुस या लोह कारखान्याला  लागुन असलेल्या दि. *21/07/2026* रोजी मंगळवार 1) उसगाव नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात
रासायनिक द्रव्य सोडत आहे. त्यामुळे वर्धा नदी प्रदूषित झाली आहे.
2) लोहखनिज प्रकल्पाद्वारे दररोज घातक वायु प्रदूषण पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होत आहे.
 3) लोहखनिज प्रकल्पाला लागून असलेल्या शेतामध्ये उसगाव नाल्यामध्ये सोडलेल्या घातक रासायनिक द्रव्यामुळे शेत पिकाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
4) Electro Static precritator मधून निघालेली धूळ व इतर निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ जसे की, डोलाचार या उद्योगाद्वारे नियम बाह्य पद्धतीने विकला जातो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण परवानगी (consent to operate) मध्ये विकण्याची परवानगी नाही. ही डस्ट पुढे कोलवाशरी कोळशात मिळविल्या जाते. हा मिलावटी कोळसा पुढे उद्योगामध्ये जाळण्यात येतो. या कारखान्यात सुद्धा ते स्वत: मिक्सिंग केलेला कोळसा रोटरी किलनमध्ये जाळतात. खराब कोळसा जाळल्यामुळे मर्यादेपेक्षा अधिक वायु प्रदूषक घटक निर्माण होतात व हवेत पसरतात. या उद्योगातील हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची क्षमता कमी पडते.
5) सायंकाळी व रात्री या उद्योगाची हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवली जाते ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर धुर, धूळ हवेत उडते व लांब परिसरातील शेती पिकांवर पडते. यामुळे नेहमी पिका चे नुकसान होते.
6) कारखान्यातून esp डस्ट व (dolachar) डोलाचार ची वाहतूक व विक्री रात्रीला केली जाते.
7) कारखान्यातील सर्व हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा निकामी व पडकी झालेल्या असतात व बहुतांश ठिकाणी त्यांची क्षमता संपलेली आहे.
8) उत्पादन प्रक्रियेतील सांडपाण्यात ग्रीस व कोळसा मिश्रीत असते व सतत नाल्यात सोडल्या जाते जे पुढे नदीत मिळते.
9) म. प्र. नि. मंडळ पर्यावरण मंजुरीच्या अटी चे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. मंजुरी पेक्षा दुप्पट प्रमाणात उत्पादन केले जाते. यामध्ये शासनाचा उत्पादन कर, आय कर करोडो रुपयांनी बुडविला जात आहे. भेसळ प्रतिबंधक कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.
10) कारखान्यात आलेला कच्चा माल व केलेले उत्पादन याच्या ख-या नोंदी केल्या जात नाही व शासनाचा महसूल बुडविल्या जातो. या कारखान्याचे environment ऑडिट, labour audit, income tax audit केले जात नाही. उत्पादनाचे व उत्पन्नाचे ऑडिट केले जात नाही व उत्पादन कर व आय कर भरले जात नाही. या सर्व प्रकारांमुळे प्रदूषण सतत वाढले आहे.
लोह खनिज कारखान्याकडून पर्यावरण कायद्याचे व शासकीय कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे कारखान्यावर कायदेशीर कारवाई करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी.
म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालय प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी, श्री. सुशील राठोड, क्षेत्राधिकारी श्री. नंदकिशोर लोमटे व श्री. स्वप्नील लिंगडे हे अधिकारी कारखान्याकडून खूप मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण करीत असल्यामुळे यांची आयपेक्षा जास्त संपत्ती जमा केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी
1) मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
2) मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
3) मा.ना. पंकजाताई मुंडे,
   पर्यावरण व जल वायु परिवर्तन  मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य.
4) मा.ना.श्री. भूपेंद्रजी यादव केंद्रीय पर्यावरण, वन व जल
 वायु परिवर्तन मंत्री भारत सरकार.
यांना राजेश वारलुजी बेले, संस्थापक अध्यक्ष, संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था,
चंद्रपूर, जटपुरा वार्ड क्र. १, चंद्रपूर यांनी केली आहे. व
*प्रतिलीपी*
1. मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार,
   माजी अर्थ व वने व सांस्कृतिक मंत्री, बल्लारपूर,
   ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर
2. मा. श्री. प्रधान सचिव, पर्यावरण मंत्रालय,
   फॉरेस्ट वातावरण बदल (MOEFCC)
   भारत सरकार, नई दिल्ली-22
3. मा. श्री. मुख्य सचिव,
   मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-32
4. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मंत्रालय, मुंबई
5. मा. सदस्य सचिव,
   महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई
6. मा. जिल्हाधिकारी,
   जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर
7. मा. प्रादेशिक अधिकारी,
   महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना देण्यात  आलेल्या आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page