राणी राजकुंवर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी.
*ज्योत्स्ना वानखेडे*
दिनांक 25 जुलै 2026 रोजी शहराच्या मध्यभागी असलेली राणी राजकुंवर प्राथमिक शाळा! येथे भारतीय संस्कृतीची जोपासना व त्याची महती, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सणांची गोडी निर्माण होण्यासाठी प्रत्यक्षात पंढरपूरची वारी काढून चिमुकले विद्यार्थी ,टाळ मृदुंगाच्या गजरात जणूकाही विठ्ठलाच्या दर्शनालाच निघाले होते. या वारीत पर्यावरण व वृक्षांचे संवर्धन करण्याचे संदेशही देण्यात आले. वारीत शाळेच्या मुख्याध्यापिका ,सरिता सोनकुसरे, रसिका पोटे, रागिणी नंदुरकर , उमा पवार,अजय सरकार, संपदा संगेवार, रविना तामटकर , शीतल खोब्रागडे यांनी सहभाग घेतला.