*पोलीस स्टेशन भद्रावती यांची कारवाई*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
*घटना काय आहे?*
दिनांक *02/08/2026* रोजी दुपारी *02:00 वा.* दरम्यान मुकबिरकडून माहिती मिळाली की, *पाटिल नगर, भद्रावती* येथे काही इसम 52 तास जुगार पत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजितचा खेळ खेळत आहेत.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस स्टाफसह घटनास्थळी रेड केली असता एकूण *05 आरोपी* मिळून आले.
*अटक करण्यात आले आरोपी:*
1. *धनराज कवडुजी कांबळे* – वय 63 वर्षे, धंदा-सेवानिवृत्त, रा. पंचशील नगर, भद्रावती
2. *धर्मराज नामदेव गायकवाड* – वय 66 वर्षे, धंदा-सेवानिवृत्त, रा. पटेल नगर, भद्रावती
3. *रविंद्र बापुराव माकोडे* – वय 52 वर्षे, धंदा-मजुरी, रा. किल्ला वार्ड, भद्रावती
4. *अमोल शामराव दुरडकर* – वय 34 वर्षे, धंदा-मजुरी, रा. शिवाजी नगर, भद्रावती जि.चंद्रपूर
5. *देवानंद खुशरंग पाटिल* – वय 52 वर्षे, धंदा-मजुरी, रा. सुमठाणा, भद्रावती जि.चंद्रपूर
*जप्त केलेला मुद्देमाल:*
आरोपींच्या अंगझडतीत व घटनास्थळावरून *03 मोटार सायकल* व *05 मोबाईल* असा एकूण *₹2,14,800/-* चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सदर आरोपींविरुद्ध *पोलीस स्टेशन भद्रावती* येथे *पो.स्टे. भद्रावती अप. क्र. 715 / 2026 कलम 4, 5 मजुका* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*कारवाई कोणी केली?*
ही कारवाई मा. *पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब*, मा. *अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे*, मा. *उप वि. पोलीस अधिकारी चंद्रपूर संतोष बाकल* यांच्या मार्गदर्शनात
पो.नि. *योगेश्वर पारधी* आणि गुन्हे शोध पथकातील पोउपनि *संतोष केदार, गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, पो.स्टे. भद्रावती* यांनी केली.