Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeCrime*चंद्रपूर बसस्टँड परिसरात प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांना रामनगर पोलिसांनी काही...

*चंद्रपूर बसस्टँड परिसरात प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांना रामनगर पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले.*

*चंद्रपूर बसस्टँड परिसरात प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांना रामनगर पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले.*

*ज्योत्स्ना वानखेडे*
*तक्रारीचा तपशील:*
दिनांक *01/08/2026* रोजी तक्रारदार *श्रीमती. सुधा नारायण तुरकेले*, वय 53 वर्षे, रा. चोरखिडकी जवळ, नगीना बाग, चंद्रपूर यांनी तक्रार दिली.
त्या बस स्टँडवरून नागपूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील:
1.  *जुने वापरलेले सोन्याचे कानातील झुमके* – वजन 05 ग्रॅम, किंमत ₹72,000/-
2.  *सोन्याचे मंगळसूत्र पदकासह* – वजन 10 ग्रॅम, किंमत ₹1,45,000/-
असा एकूण *₹2,17,000/-* चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला.
या प्रकरणी पो.स्टे. रामनगर येथे *अपराध क्र. 970/2026 कलम 303(2), 3(5) भा.न्या.सं.* नुसार गुन्हा नोंद झाला.
*पोलिसांची कारवाई:*
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक *शिवाजी नागवे* यांच्या मार्गदर्शनात 2 पथक तयार करण्यात आले.
CCTV फुटेजच्या आधारे तपास केला असता 2 संशयित महिला *पडोली चौक, नागपूर* येथे दिसल्या.
*ताब्यात घेतलेल्या आरोपी:*  
1.  *रुपा विशाल नाडे* – वय 25 वर्षे, रा. रामेश्वरी टोली, नागपूर
2.  *मैना महेंद्र मानकर* – वय 35 वर्षे, रा. रामेश्वरी टोली, नागपूर
त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की चोरलेला मुद्देमाल त्यांच्या 2 साथीदारांकडे *आनंदवन चौक* येथे आहे.
तेथे छापा मारून आणखी 2 महिलांना ताब्यात घेतले:
1.  *अनिता पिंटू हातागडे* – वय 35 वर्षे, रा. रामेश्वरी टोली, नागपूर
2.  *ज्योती विजय हातागडे* – वय 32 वर्षे, रा. रामेश्वरी टोली, नागपूर
*ज्योती हातागडेकडे झडती घेतली असता चोरीचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला:*
– सोन्याचे कानातील झुमके 05 ग्रॅम – ₹72,000/-
– सोन्याचे मंगळसूत्र 10 ग्रॅम – ₹1,45,000/-
दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
*कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी:*
या कारवाईचे मार्गदर्शन मा. *पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी*, मा. *अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे*, मा. *उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद चौगुले* यांनी केले.  *पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके*
कारवाईत पो.नि. *शिवाजी नागवे*, सपोनि. *उगले*, पोउपनि. *कृष्णा दराडे* आणि गुन्हे अन्वेषण पथकातील इतर  कर्मचारी सहभागी होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page