*चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना केंद्रीय गृह मंत्रालयाची ‘उत्कृष्ट’ व ‘अतिउत्कृष्ट सेवा पदके’ जाहीर
*ज्योत्स्ना वानखेडे*:
राज्य पोलीस दलामध्ये अखंडपणे, निष्ठेने व विशेष कौशल्याने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत दरवर्षी मानाची सेवा पदके प्रदान करण्यात येतात.
या नियमावलीनुसार पोलीस दलात *15 वर्षे* उल्लेखनीय सेवा पूर्ण करणाऱ्यांना *’उत्कृष्ट सेवा पदक’* तसेच *25 वर्षे* अखंड व विशेष सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना *’अतिउत्कृष्ट सेवा पदक’* देऊन गौरविण्यात येते.
सन *2026* या वर्षासाठी गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून जाहीर झालेल्या यादीमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर आस्थापनेवरील खालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानाची पदके प्रदान करण्यात आली आहेत:
**अ.क्र.** **नाव व पद** **सध्याची नेमणूक** **प्राप्त पदक (2026)**
**1** **श्री. सत्यजित शशिकांत आमले**
पोलीस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी, मूल उपविभाग **अतिउत्कृष्ट सेवा पदक**
**2** **श्री. दिनेश त्रंबक लबडे**
पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमूर, जि. चंद्रपूर **उत्कृष्ट सेवा पदक**
**3** **श्री. प्रविण रामचंद्र खरतड**
पोलीस उपनिरीक्षक (अभियांत्रिकी) बिनतारी संदेश विभाग, जि. चंद्रपूर **अतिउत्कृष्ट सेवा पदक**
**4** **श्री. गुलाब रामचंद्र बलकी**
ग्रेड पोलीस उपनिरीक्षक / 1763 पोलीस स्टेशन पाथरी, जि. चंद्रपूर **उत्कृष्ट सेवा पदक**
पोलीस सेवेत बजावलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व अंमलदारांतर्फे पदकप्राप्त सर्व पोलीस बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील उज्ज्वल कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.