*मान. पालकमंत्री ना.डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते भव्य ‘मुद्देमाल हस्तांतरण सोहळा’ उत्साहात संपन्न*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भारतीय न्याय संहितेच्या नव्या कायद्यानुसार जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला तब्बल *3 कोटी 59 लाख रुपये (₹3,59,00,500/-)* किमतीचा मौल्यवान मुद्देमाल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मूळ फिर्यादींना सन्मानाने परत करण्यात आला.
दिनांक *15 ऑगस्ट 2026* रोजी सकाळी 9:30 वाजता पोलीस बहुउद्देशीय सभागृह, तुकूम, चंद्रपूर येथे आयोजित या सोहळ्यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री *मा.ना. डॉ. श्री. अशोक उईके* यांच्या शुभहस्ते फिर्यादींना हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.
*सोहळ्यात वाटप करण्यात आलेल्या प्रमुख मुद्देमालाचा तपशील:*
– *वाहने व गॅस सिलेंडर्स:*
पडोली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील अशोक लेलँड ट्रक, 342 गॅस सिलेंडर्स व रोख रक्कम (एकूण किंमत ₹39,68,531/-), राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ₹31,00,000/- किमतीचे टाटा आयशर वाहन, तसेच विविध ठाण्यातील चोरीस गेलेल्या रॉयल एनफील्ड (बुलेट), होंडा शाईन, स्प्लेंडर व ऍक्सेस मोपेड यांसारख्या दुचाकी गाड्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या.
– *सोना-चांदीचे मौल्यवान दागिने:*
रामनगर, बल्लारपूर, सावली व घुग्घूस पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात हस्तगत केलेले सोन्याचे पाटल्या, चपलाकंठी, पोत, अंगठ्या, लॉकेट, सोन्याचे लगड, चांदीची भांडी व नाणी
(ज्यामध्ये रामनगर – ₹34.16 लाख, बल्लारपूर – ₹18.23 लाख, सावली – ₹14.75 लाख, घुग्घूस – ₹5.41 लाख) असा लाखो रुपयांचे दागिने तक्रारदारांना सोपवण्यात आले.
– *सायबर फसवणूक :*
सायबर सेल (NCCRP) मार्फत त्वरित कारवाई करून ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेल्या तक्रारदारांचे तब्बल *₹12,48,237/-* परत देण्यात आले.
– *रोख रक्कम :*
विविध गुन्ह्यातील पडोली व रामनगर पोलिसांकडून जप्त रोख रक्कम (₹9.47 लाखाहून अधिक) संबंधितांच्या स्वाधीन करण्यात आली.
– *गहाळ मोबाईल फोन:*
(CEIR PORTAL) मार्फत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत हरवलेल्या/चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते थेट तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आला.
*उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा गौरव (TOP-3 पोलीस ठाणे):*
मुद्देमाल जप्ती व हस्तांतरणाच्या प्रक्रियेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील प्रथम तीन पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल हेड मोहरर यांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते विशेष प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले:
– *प्रथम क्रमांक – पोलीस स्टेशन रामनगर (मुद्देमाल: ₹ 65,55,730/-)*
o ठाणे प्रभारी अधिकारी: पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके
o ठाणे मुद्देमाल हेड मोहरर: सफौ/2010 श्री. अनिल आत्राम
– *द्वितीय क्रमांक – पोलीस स्टेशन बल्लारशा (मुद्देमाल: ₹ 30,24,149/-)*
o ठाणे प्रभारी अधिकारी: पोलीस निरीक्षक श्री. बिपिन इंगळे
o ठाणे मुद्देमाल हेड मोहरर: पोहवा/161 श्री. श्रीकांत मेंढे
– *तृतीय क्रमांक – पोलीस स्टेशन सावली (मुद्देमाल: ₹ 15,65,320/-)*
o ठाणे प्रभारी अधिकारी: पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पुल्लरवार
o ठाणे मुद्देमाल हेड मोहरर: पोहवा/2484 श्री. विनोद वाघमारे
*मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:*
या कार्यक्रमास महापौर मान. सौ. संगिता खांडेकर, खासदार मान. श्रीमती प्रतिभा धानोरकर, आमदार श्री सुधाकर अडबाले, श्री सुधीर मुनगंटीवार, श्री किशोर जोरगेवार, तसेच जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुलकित सिंह (भा.प्र.से.) व मनपा आयुक्त श्री. अकुनुरी नरेश (भा.प्र.से.) यांचेसह पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी (भा.पो.से.), व अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक *श्री. आयुष नोपानी (भा.पो.से.)* यांनी उपस्थितांचे स्वागत करून चंद्रपूर पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा मांडला.
पालकमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात चंद्रपूर पोलिसांच्या तत्परतेचे व गुन्हे उकल करण्याच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासोबतच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
अपर पोलीस अधीक्षक *श्री. ईश्वर कातकडे (म.पो.से.)* यांनी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे (म.पो.से.) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. चोरीस गेलेला मौल्यवान मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी चंद्रपूर पोलीस दलाप्रती मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.