*पोक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष सुटका, अधिवक्ता संजय बाजपेयी यांचा प्रभावी युक्तिवाद*
मा. जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोपाखाली चाललेल्या पोक्सो प्रकरण सरकार विरुद्ध नाना उर्फ संतोष सरकाटे उर्फ नाना प्रकाश येरमे या आरोपीवर भा.द. वि. ची कलम 376 (3), 376 (2) ( f ), 376 ( 2 ) ( n ), 323 सह पोक्सो अॅक्ट 2012 ची कलम 4 आणि 6, सह बालन्याय ( मुलांची काळजी व सरंक्षण ) अधिनियम 2015 ची कलम 75 च्या आरोपापासून बचाव पक्षाच्या प्रभावी युक्तिवादानंतर आरोपीला 20/08/2026 रोजी गुरुवारला निर्दोष मुक्त केले.
या प्रकरणात अभियोजन पक्षाकडून सरकारी अधिवक्ता आसिफ शेख आणि आरोपी पक्षाकडून अधिवक्ता संजय प्रभूदयाल बाजपेयी बल्लारपुर यांनी आपआपली बाजू मांडली. सरकार पक्षाने आरोपी विरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी विविध साक्षीदार व दस्तायेवजी पुरावे न्यायालयासमोर सादर केले. पण आरोपी याचे बचाव पक्षाचे अधिवक्ता संजय बाजपेयी यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे 20/08/2026 रोज गुरुवारला जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुरने आरोपीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली.