*पत्ते खेळू न दिल्याच्या कारणावरून जिवाने ठार मारणाऱ्या आरोपीस मा. ए.के. लाहोटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांनी जन्मठेपाची शिक्षा सुनावली*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ११/१२/२०२२ रोजी सकाळी ०९/०० वाजेच्या सुमारास बामणवाडा ता. राजुरा येथे यातील मृतक ने आरोपीस पत्ते खेळू दिले नाही म्हणून आरोपीने खेळत असलेल्या ठिकाणी पाणी टाकले, त्यामुळे त्याचे भांडण झाले. भांडणाचा रागात आरोपीने लोखंडी सुरी मृतकचा पोटात खुपसुन ठार केले. अशा फिर्यादीचा तोंडी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे राजुरा येथे तत्परतेने गुन्हा रजिस्टर क्र. ५००/२०२२ कलम ३०२ भादवी सह ४,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल केले.
*मा. न्यायालयाचा निकाल*
सदर खटल्याची सुनावणी मा. ए.के. लाहोटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोकता श्रीमती सिमा रामटेक, श्री. पि. जि. घट्टूवार यांनी मांडण्यात आलेला युक्तिवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस दिनांक २४/०९/२०२६ रोजी आरोपीस कलम ३०२ भादवी कायद्यान्वये जन्मठेप वर्ष सक्त कारावास व ५,००० रू दंड, दंड न भरल्यास ३ महीण्याचा साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.
*तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी*
– तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलीस स्टेशन राजुरा
– सरकारी अभियोकता अॅड श्रीमती सिमा रामटेक, श्री. पि. जि. घट्टूवार
– कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार ललीता शेंडे ब.न. १५५ पोस्टे राजुरा
– दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर
सदर कामगिरी मा. आयुष नोपानी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आ