*ईद मिलादुन्नबी कमिटी, बल्लारपूर यांच्या वतीने हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम (स.अ.) यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी नगर परिषद चौक येथे ईद मिलादुन्नबी कमिटी, बल्लारपूर यांच्या वतीने हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम (स.अ.) यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा,न. प. बल्लारपूर) मा. श्री. डॉ. अनिल सदाशिव वाढई (संचालक, जि. म. स. बँक, चंद्रपूर) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
याप्रसंगी श्री.अब्दुल करीम शेख (शहराध्यक्ष, काँग्रेस), श्री. देवेंद्र आर्या (उपाध्यक्ष), सौ. छाया मडावी – नगरसेविका , अँड.मेघा भाले महिला व बालकल्याण सभापती , सौ. वैशाली हुमने- नगरसेविका, श्री. पवन भगत , श्री. दिपक धोपटे, श्री. भास्कर माकोडे- नगरसेवक, श्री. इस्माईल ढाकवाला- सभापती, श्री. पवन मेश्राम- नगरसेवक, श्री. सलीम अहमदजी- नगरसेवक, श्री. बिपिन इंगळे- पोलिस निरीक्षक, बल्लारपूर
तसेच इतर नगरसेवक, नगर परिषदेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बल्लारपूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार तसेच हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम (स.अ.) यांच्या विचारांवर संवाद आयोजित करण्यात आला. सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत धर्मनिरपेक्षता, सामाजिक सलोखा सुंदर दर्शन घडविले. यावेळी मा. नगराध्यक्षा व धर्मगुरू यांनी आपल्या मनोगतात प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देत समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांचा सन्मान राखून एकतेने व सौहार्दाने पुढे जाण्याचे आवाहन केले.