Saturday, August 29, 2026
spot_img
HomePolice*अल्पवयीन पिडीतेवर दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीस १० वर्ष कठोर शिक्षा आणि दंड*

*अल्पवयीन पिडीतेवर दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीस १० वर्ष कठोर शिक्षा आणि दंड*

*अल्पवयीन पिडीतेवर दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीस १० वर्ष कठोर शिक्षा आणि दंड*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक २८/०२/२०२३ रोजी सकाळी १४/३० वाजेच्या सुमारास पिडीतेचे घराजवळ राहणारा ज्याला पिडीता मामा म्हणत होती, त्याआरोपीने पिडीतेसोबत वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करीत होता. तिचा आईने विचारल्यावरून सदर बाब हि पिडीतेने सांगीतली सरकारी दवाखाण्यात तिला नेले असता डॉक्टरांनी तिचेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले वरून फिर्यादीचा रिपोर्ट वरून पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे तत्परतेने गुन्हा रजिस्टर क्र. २०१/२०२३ कलम ३७६(३), ३७६, (२) (एन), ४५०, ५०६ भादवी सह ४ पोक्सो कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले.
*मा. न्यायालयचा निकाल*
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. पि. एम गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्‍ता श्री. आसीफ शेख यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस दिनांक २७/०८/२०२६ रोजी आरोपीस कलम ३७६(२)(एन) कायद्यान्वये १० वर्ष सश्रम कारावास व ५,००० रू दंड दंड न भरल्यास १ महीण्याचा साधा कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६(II) भादवी मध्ये २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली.
*तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी*
– तपासी अधिकारी महीला पोलीस उपनिरीक्षक सोनाली आगलावे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर
– सरकारी अभियोक्‍ता अॅड आसीफ शेख
– देखरेख अधिकारी पोनी निशीकांत रामटेके पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर
– कोर्ट पैरवी अधिकारी महीला पोलीस हवालदार किशोरी वामनराव गोंडे ब.न. २३७० पोस्टे चंद्रपूर शहर
– दोषसिध्दी कक्ष, चंद्रपूर
सदर कामगीरी मा. आयुष नोपाणी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page