Tuesday, September 1, 2026
spot_img
HomeCourt*पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती आरोपीस ०५ वर्ष...

*पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती आरोपीस ०५ वर्ष कठोर शिक्षा आणि दंड*

*पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती आरोपीस ०५ वर्ष कठोर शिक्षा आणि दंड*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ०३/०२/२०२३ रोजी सकाळी १४/३० वाजेच्या सुमारास आरोपी पतीने, फिर्यादी पत्नीचा चारित्र्यावर संशय घेवुन फिर्यादी आपले हॉस्पीटलचे काम आटपवुन घरी परत येत असताना यातील आरोपीने स्वागत मंगल कार्यालयामागे फिर्यादीस घरी चाल असे म्हटले व फिर्यादीने घरी जाण्यास नकार दिले असता आरोपीने सत्तुर ने फिर्यादीच्या डोक्यावर हातावर व पायावर दोन तिन वेळा वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा फिर्यादीचे बयानावरून व वैद्यकीय अहवाला वरून पोलीस ठाणे ब्रम्हपुरी येथे तत्परतेने गुन्हा रजीस्टर क्र. ४८/२०२३ कमलम ३०७ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल केले.
*मा. न्यायालयाचा निकाल*
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. पि. एम. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोकता श्री. सुधाकर डेगावार यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस दिनांक ३१/०८/२०२६ रोजी आरोपीस कलम ३०७ भादवी कायद्यान्वये ०५ वर्ष सक्त कारावास व ५,००० रू दंड, दंड न भरल्यास १ महीण्याचा साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.
*तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी*
– तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेद्रं प्रभाकर उपरे, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी
– सरकारी अभियोकता ॲड श्री. सुधाकर डेगावार
– कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार प्रकाश शेंदरे ब.न. २२७ पोस्टे ब्रम्हपुरी
– दोषसिध्दी कक्ष, चंद्रपूर
सदर कामगीरी मा. आयुष नोपाणी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page