Friday, September 11, 2026
spot_img
HomeEducation*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिक्षक दिन साजरा*

*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिक्षक दिन साजरा*

*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिक्षक दिन साजरा*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस. एम. बोबडे, प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक एम. डी. टोंगे, आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर यांची मंचावर उपस्थित होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थिनी गायत्री टेकाम, त्रिशाली महानंद, आनंदी गवई, राशी वेले यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
स्वयंशासन मध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना, पहिला – त्रिशाली  महानंद , दुसरा अनुष्का दुर्गे, तिसरा आनंदी गवई, प्रोत्साहनपर रुपाली निमकर, मुख्याध्यापक – राशी वेले, शिपाई – अमनसिंग नायक यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
मंचावर उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर शिक्षक दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक आर. बी. अलाम, संचालन एस. एम. चव्हाण,  आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश चंदावार, जगदीश कांबळे, इंद्रभान अडबाले, रजिता वदनलवार उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page