*शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक व योजना यांच्याकडील प्रलंबित प्रकरणावर विनायक महामुनी, मुख्यकार्यकारी यांना आग्रह!-पवन नेटे, सचिव*
*ज्योत्स्ना वानखेडे*: खाजगी शाळा शिक्षक संघ,नागपूर आंदोलन शनिवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२६, दुपारी तीन ते पाच वेळात विधिमंडळ सीकृत अतारांकित प्रश्न क्रमांक ५७८४ अनुषंगाने खाजगी शाळा शिक्षक संघाचे पदाधिकारी यांचेसोबत चर्चा करण्यात आली. परंतु अनेक महिन्यांपासून प्रलंबित अनुकंपा नियुक्तीस मान्यताप्रदान करण्यात आलेल्या नाहीत, मान्यताप्रदान आदेश व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर नियमित शिक्षक मान्यता आदेश यावेळी अपेक्षित आहे,अनेक बाबतीत अनिमित्तता दिसुन आलेली आहे,अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी असतांना नविन पदभरतीस परवानगी देण्यात आलेल्या आहे,अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नकारात्मक भुमिकेविरुद्ध कारवाई नाही,अनुकंपाग्रस्तांच्या फाईल्स गहाळ आहे.
शिक्षणाधिकारी योजना जिल्हापरिषद नागपूर यांनी खाजगी शाळा शिक्षक संघाचे पदाधिकारी,यांचेसोबत प्रलंबित अनुकंपाग्रस्त नियुक्तीबाबत चर्चा व नियुक्ती न देणाऱ्या संस्थेविरोधात शासन निर्णय, दिनांक ४ जुन २०२६ मधिल तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत निर्णय अपेक्षित आहेत,सकारात्मक निर्णय घेण्यात यावेत.
शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी उपरोक्त पत्रातील विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहेत,निर्णय तातडीने घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले,अपवादात्मक बाबी,शाळांची आरटीई मान्यताप्रदान आदेश वगळता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले होते.
नागपूर जिल्हयातील भ्रष्टाचारावर सहसचिव,मुख्यमंत्री सचिवालय,हैद्राबाद हाऊस,सिव्हिल लाईन्स नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,सिव्हिल लाईन्स, नागपूर यांनी वैयक्तिक लक्ष घालावेत अशी विनंती निवेदनात करण्यात आली,निवेदन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताबर्डी यांचे मार्फत पाठविण्यात आले
प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, मोरेश्वर मौंदेकर,पवन नेटे,विद्या मोरे-घोष,शबाना शेख,पुरुषोत्तम कामडी,कुलसुंगे, भिमराव भगत, धनराज वैद्य,आशिष टीपले,मिनाक्षी भगत,भिमराव वानखेडे,विजय ज्ञानेश्वर घंगारे,विजय आगरकर, मोहन परसोडकर, कृष्णा चिचघरे, दिलीप निखाडे,शेखर गौरी, ज्ञानेश्वर रेवतकर,ए.एस.नंदनवार, प्रेमदास धाबर्डे, संगीता चहांदे,एम.बी गीरी, संजय बोरगावकर, राजेश चिकाटे,तानबा बारहाते,पितांबर मेघरे,नरेंद्र चव्हाण, कुमुद बालपांडे,धिरज ईखारकर,हर्ष बांते,वंदना ,ज्ञानेश्वर डायगव्हाणे,ज्योती खंडाळे,वैष्णवी खंडाळे,दिलीप पिसे,प्रामुख्याने उपस्थित होते.