*मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस ताब्यात घेवून दुचाकी वाहन जप्त*
*७०,००० रु चा मुद्देमाल जप्त*
*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कार्यवाही*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. ०८/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, शुभम जाधव रा. इंदिरानगर चंद्रपूर हा शासकीय दुध डेअरी चंद्रपूर परीसरात चोरीचे वाहन विक्रीकरीता घेवुन फिरत आहेत वरून शासकीय दुध डेअरी परीसरात सापळा रचुन आरोपी नामे शुभम बिरन जाधव, वय १८ वर्ष, रा. इंदीरानगर रेल्वे पटरी जवळ चंद्रपूर यास ताब्यात घेतले असता त्यांचेकडे पोस्टे मुल अप क्र. ६३७/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.स. या गुन्ह्यातील चोरीस गेलेली ऑरेंज रंगाची बजाज पल्सर एन.एन. १२५ मोटार सायकल क्र. एम.एच. २६ सि.टी. ०७६० किं.अं. ७०,००० रू ची मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली असुन आरोपी पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री.आयुष नोपानी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा.श्री.ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री.अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, पोअं प्रतिक हेमके, पोअं विठ्ठल काकडे, पोअं/ प्रफुल पुप्पलवार पोशी/दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.