Friday, September 11, 2026
spot_img
HomeEducation*शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून शाळांचा सर्वांगीण विकास साधा – शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप...

*शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून शाळांचा सर्वांगीण विकास साधा – शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह*

*शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून शाळांचा सर्वांगीण विकास साधा – शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शाळांचा भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
*‘PGI’मध्ये ३४ व्या स्थानावरून ९ व्या स्थानी झेप*
गडचिरोलीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षण यंत्रणेचे विशेष कौतुक करण्यात आले.
*शाळांना नियमित भेटी अनिवार्य*
प्रत्यक्ष शाळांना भेटी न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचे निर्देश.
*शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यावर भर*
विद्यार्थी गळती शून्यावर आणण्यासाठी प्रभावी उपाययोजनांच्या सूचना.
*मूलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य*
वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश.
*‘सायन्स सोमवार’ आणि ‘गणित गुरुवार’ प्रभावीपणे राबवा*
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व गणितीय विचारसरणी विकसित करण्यावर भर.
*पेसा क्षेत्रातील युवकांसाठी मोफत TET-TAIT ऑनलाइन कोचिंग*
स्थानिक D.Ed. व B.Ed. पात्र उमेदवारांसाठी मार्गदर्शन व समुपदेशनाचा आराखडा तयार होणार.
*एकाही विद्यार्थिनीचे शिक्षण वाहतुकीअभावी थांबू नये*
अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्याच्या सूचना.
*आधार पडताळणी, MBU व APAAR ID चे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश.*
गडचिरोलीतील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण शिक्षण यंत्रणेने परिणामाभिमुख पद्धतीने काम करावे, असे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page