Thursday, September 17, 2026
spot_img
HomeRajura*राजुरा पोलीस ठाण्याकडून बुलेट मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमावर गुन्हे शोध पथकाची धडक...

*राजुरा पोलीस ठाण्याकडून बुलेट मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमावर गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; आरोपी गजाआड, ₹1,00,000/- चा मुद्देमाल हस्तगत*

*राजुरा पोलीस ठाण्याकडून बुलेट मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमावर गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; आरोपी गजाआड, ₹1,00,000/- चा मुद्देमाल हस्तगत*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
राजुरा पोलीस ठाणे हद्दीतील चुनाळा येथून चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटारसायकल शोधण्यात गुन्हे शोध पथकाला (DB Squad) यश आले असून, अवघ्या काही दिवसांत आरोपीस वर्धा जिल्ह्यातून अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 12/08/2026 रोजी रात्री 23:00 वा. ते दिनांक 01/09/2026 रोजी सकाळी 11:00 वाजेदरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोर (चुनाळा) उभी केलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल अज्ञात चोराने पळवून नेली होती. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. 713/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. इंचार्ज सपोनि लक्ष्मण लोकरे व पथक आरोपीचा शोध घेत होते. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तलोडी (कुटकी), ता. सेलू, जि. वर्धा येथे छापा टाकून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
*अटक आरोपीचे नाव व पत्ता:*
– अनुराग प्रवीण धाबर्डे, वय 21 वर्ष, व्यवसाय: मजुरी, रा. तलोडी (कुटकी), ता. सेलू, जि. वर्धा.
*जप्त मुद्देमालाचा तपशील:*
– काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल (क्र. MH 34 AX 1120) — अंदाजे किंमत: ₹1,00,000/-.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. कुमार सुशांत (उपविभाग राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलींद जांभुळे, महेश बोलगोडवार, रमेश बस्सी व राजीव दुबे यांनी पार पाडली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page