विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण/ महानगर ) द्वारा सिंदेवाही येथे सहविचार सभा संपन्न
ज्योत्स्ना वानखेडे:
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण / महानगर) द्वारे तुलसी लॉन सिंदेवाही येथे १७ मे २०२६ रोजी आयोजित सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी विमाशी संघाचे सरकार्यवाह तथा आमदार श्री सुधाकर अडबाले उपस्थित होते.
यावेळी आमदार ॲड. अभिजीत वंजारी, महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश जुनघरी, सदस्य श्री. लक्ष्मणराव धोबे, सदस्य श्री. प्रवीण नाकाडे, श्री. मारोतराव अतकरे, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह श्री. दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष मोहम्मद शकील, महानगर कार्यवाह श्री. सुरेंद्र अडबाले, जिल्हा उपाध्यक्ष श्री. आनंद चलाख, जिल्हा सहकार्यवाह श्री. नंदकिशोर वर्धलवार, श्री. अजय विधाते, श्री. हरीहर खरवडे‚ आसमा खान मॅडम, रूपाली मुंगल मॅडम, श्री. पेद्दीलवार सर, श्री. भाउरावजी राउत, आदिवासी आश्रमशाळा विभागाचे श्री. प्रमोद साळवे, श्री. मनोज आत्राम, श्री. वरारकर सर व मोठ्या संख्येने जिल्हा, तालुका पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री सुधाकर अडबाले व आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांनी शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच नोव्हेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विमाशि संघाचे सिंदेवाही तालुका (ग्रामीण) अध्यक्ष श्री. के. बी मांडवकर, कार्यवाह श्री व्ही.जी. पाकेवार, शहर अध्यक्ष श्री. अतुल शेंडे, कार्यवाह श्री. आर. टी. बोरकर, सल्लागार मंडळ श्री. किंदर्ले सर, श्री. सोनुले सर, श्री. कंटीवार सर यांनी परिश्रम घेतले.