सहकार सप्ताहानिमित्त कर्ज वितरण कार्यक्रम
*ज्योत्स्ना वानखेडे*:
सहकार महर्षी ॲड. बाबासाहेब वासाडे सहकार सप्ताह अंतर्गत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा – बल्लारपूर यांच्या वतीने विविध लाभार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात आले.
यावेळी सावित्रीबाई महिला बचत गटास ₹2,00,000/- (रुपये दोन लाख) कर्जाचे वितरण करण्यात आले. तसेच बँकेचे सभासद श्री. दिनेश मनोहर शेरकी सर यांना वैयक्तिक पत कर्ज ₹15,00,000/- (रुपये पंधरा लाख) वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे संचालक मा. श्री. डॉ. अनिल वाढई साहेब, शाखाधिकारी कु. सी. जी. काकडे मॅडम, बी.ओ.-1 कु. एस. एन. खवसे मॅडम, निरीक्षक श्री. सी. ए. येटे, कॅशियर श्री. डी. एस. कुमरे, लिपिक कु. शीतल रागीट, कु. कनिजा शेख, श्री. सतीश वाकोडे तसेच शाखेचे समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि सभासदांना आर्थिक आधार देण्याच्या बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
— चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा बल्लारपूर