*रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारू जप्त*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ०२/१०/२०२६ रोजी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत बल्लारशाह बायपास रोडवरील किशाेर इलेक्ट्रॉनिक्स समोर मिळालेल्या बातमीच्या आधारे धाड टाकून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा आरोपी व वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
*आरोपीचे नाव:* मरपल्ली गणेश गौंड व्यंकटेश गौंड (वय २५ वर्षे, रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपूर)
*कायदेशीर कलम:* कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम
*जप्त मुद्देमाल:*
१. देशी दारू: रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारू (५०० नग, ९० एमएल) – किंमत ₹२०,०००/-
२. वाहन: पांढऱ्या रंगाची मिट्सुबिशी पजेरो चारचाकी (क्र. AP 28 BW 0828) – किंमत ₹५,०००,०००/-
*एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹५,२०,०००/-*
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
**कारवाई पथक :** उपविभाग चंद्रपूर पथक