Thursday, October 8, 2026
spot_img
HomePoliticalपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनानिमित्त भाजप चंद्रपूर महानगरतर्फे ‘विकसित...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनानिमित्त भाजप चंद्रपूर महानगरतर्फे ‘विकसित भारत सेवा संकल्प सभा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनानिमित्त भाजप चंद्रपूर महानगरतर्फे ‘विकसित भारत सेवा संकल्प सभा’

भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प,  ‘सेवा ज्योती यात्रा’

*Jyotsna Wankhede*: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या वाटचालीनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने बुधवारी महेश भवन येथे ‘विकसित भारत सेवा संकल्प सभे’चे आयोजन करण्यात आले. यावेळी विकसित भारताच्या संकल्पाची सामूहिक शपथ घेण्यात आली. तसेच ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली.

या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर प्रमुख वक्ते, तर आमदार किशोर जोरगेवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, किसान आघाडी प्रदेश सदस्य खुशाल बोंडे, महामंत्री रविंद्र गुरुनुले, मनोज पॉल, सविता दंढारे, नामदेव डाहुले, श्याम कनकम, माजी उपमहापौर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, दशरथसिंह ठाकुर, तुषार सोम, वंदना हातगावकर, विनोद खेवले, स्वप्नील डुकरे, प्रदीप किरमे, अॅड. सारिका संदुरकर, रवि जोगी, सुभाष अदमाने आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा आढावा घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा प्रवास हा राष्ट्रसेवेची बांधिलकी आणि विकासाच्या ध्येयाने प्रेरित असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाची नवी दिशा स्वीकारली असून, गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प साकार करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे हंसराज अहिर म्हणाले.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीत ‘सेवा’ या भावनेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केवळ राजकीय कामापुरते मर्यादित न राहता सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. सेवा कार्यातूनच समाजाशी असलेले नाते अधिक दृढ होते, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आणताना स्थानिक पातळीवरील विकासालाही तितकेच महत्त्व आहे. चंद्रपूरमधील नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.

युवकांच्या कौशल्याला योग्य संधी, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपक्रम आणि सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे ही काळाची गरज आहे. विकसित भारताची सुरुवात विकसित गाव, विकसित शहर आणि सक्षम नागरिकांपासून होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसराच्या प्रगतीत योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.

दरम्यान, कार्यक्रमात उपस्थितांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली. सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या यात्रेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page