*“ KVR कंपनीमध्ये खंडणी मागणा-या आरोपीतांना दुर्गापूर पोलीसांकडून अटक ”*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक 07/10/2026 रोजी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे माहिती मिळाली की, तीन आरोपी हे वरवट येथील KVR कंपनीमध्ये येवून कंपनीतील मॅनेजर साईप्रकाश गाजुला यांना “ यहा कंपनी चलानी है तो महीने के 50,000/-रु. देणे पडेंगे, पैसे नही दिये तुझे मार डालुंगा ” असे बोलुन मॅनेजर यास मारहाण व खंडणी मागीतल्याचे तक्रारीवरून आरोपी क्र.01) अजय कुचनकर 02) सुमित रामटेके 03) पवन जाधव याचे विरुद्ध कलम 308(4),308(5),115(2),333,3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्ह्याची नोंद घेवुन नमुद तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली.