Saturday, October 10, 2026
spot_img
HomeUncategorized*पोलीस स्टेशन पडोली हद्दीत गोवंशाची अवैध व अमानुष वाहतूक करणाऱ्या आयचर ट्रकवर...

*पोलीस स्टेशन पडोली हद्दीत गोवंशाची अवैध व अमानुष वाहतूक करणाऱ्या आयचर ट्रकवर धाडसी कारवाई*

*पोलीस स्टेशन पडोली हद्दीत गोवंशाची अवैध व अमानुष वाहतूक करणाऱ्या आयचर ट्रकवर धाडसी कारवाई*

*एकूण २८ नग गोवंशीय जनावरांची सुटका, एका आरोपीस अटक,*

*एकूण ₹ २१,९३,०००/- चा मुद्देमाल जप्त*

*पोलीस स्टेशन पडोली ची कामगिरी*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन पडोली हद्दीत पोलीस स्टाफ मिळून पडोली चौकासमोर नाकाबंदी करीत असता, मिळालेल्या गुप्त खबरेप्रमाणे एक 06 चक्का आयचर ट्रक (लाल रंगाचा, ज्यावर निळ्या रंगाची ताडपत्री झाकलेली) क्रमांक MH-28-BB-4970 चंद्रपूरकडून इरई नदी मार्गाने येताना दिसला.
सदर ट्रकला पडोली चौकाजवळ हात दाखवून थांबविण्याबाबत इशारा करून रोडच्या बाजूला घेण्यास सांगितले असता, ट्रक चालकाने आपले वाहन रोडच्या बाजूला वळवून पेट्रोल पंपाच्या आवारातून (प्रिमायसेस) यु-टर्न घेऊन रॉग साईडने अतिवेगाने वाहन चालवत पळ काढला. सदर वाहन कोसारा फाटा चौकातून देवाडा मार्गे वेंडली व राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरोडा कडे पळून जात असताना पोलीसांनी पाठलाग केला. वरोडा गावातील रोडवर अडथळा निर्माण करून वाहन थांबविले असता, जनावर वाहतूक करणारा चालक वाहन जागेवर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलीस पथकाने तात्काळ पाठलाग करून गावाच्या शेतशिवारात चालकास शिताफीने ताब्यात घेतले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अमानुषपणे कोंबून भरलेली गोवंशीय जनावरे मिळून आल्याने जनावरांसह व वाहनासह आरोपीस पोलीस स्टेशनला आणून आरोपी विरूध्द पो.स्टे. पडोली येथे अप. क्र. 316/2026 कलम 5(1), 5(ब), 9, 11 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारीत 2015), सहकलम 11(1)(ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960, सहकलम 132/179, 184 मोटर वाहन कायदा (मोवाका) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आरोपी नामे अब्दुल हफिज गुफ्रान खान, वय 33 वर्षे, रा. वार्ड क्र. 04, कुरेशी मोहल्ला, गडचांदूर (आयचर ट्रक चालक) यास अटक करण्यात आली आहे.
*हस्तगत मुद्देमाल*
क्र. मुद्देमालाचा तपशील किंमत (रु.)
01. एकूण 28 नग गोवंशीय जिवंत जनावरे (बैल व गाय) 1,83,000/-
02. टाटा कंपनीचा 06 चक्का आयचर ट्रक क्र. MH-28-BB-4970 20,00,000/-
03. आरोपीच्या ताब्यातील विवो (VIVO) कंपनीचा मोबाईल फोन 10,000/-
**एकूण जप्त मुद्देमाल:** **21,93,000/-**
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुधाकर कोकडे, पोलीस निरीक्षक, विनोद वानकर, पो.हवा. / 2892, धिरजकुमार लोधी, पो.अं. / 63, समीर खाडे, पो.अं. / 340, श्रीनीवास वाभीटकर, पो.अं. / 256, धिरज भोयर, पो.अं. / 1482 यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page