*दोन हजार रुपये द्या आणि नोंदणी प्रमाणपत्र घ्या. दलाल सक्रिय?*
चंद्रपूर जिल्ह्यात सहाय्यक कामगार आयुक्त कडून नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी, दोन हजार रुपये ची मागणी होत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली आहे.
कामगारांना जे प्रमाणपत्र लागते त्या प्रमाणपत्रासाठी ते ग्रामपंचायत/नगरपरिषद/महानगरपालिका/संबंधित ठेकेदार यांच्याकडे जावे लागते, सदर माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झालेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये दलालाचा भरणा आहे. त्यांच्याकडे दोन हजार रुपये जमा केले की, ते सर्व सेटिंग करून प्रमाणपत्र संबंधित कामगाराच्या हाती आणून देण्याचे आश्वासन विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाले आहे.