Thursday, October 22, 2026
spot_img
HomeChandrapur*समतानगर, तुकुम येथील घरात जुगार खेळणारे व खेळविणा-या ११ लोकांवर रामनगर पोलीसांचा...

*समतानगर, तुकुम येथील घरात जुगार खेळणारे व खेळविणा-या ११ लोकांवर रामनगर पोलीसांचा छापा. १२,०६,४४०/- रू. कि.चे जुगाराचे साहित्य जप्त.*

*समतानगर, तुकुम येथील घरात जुगार खेळणारे व खेळविणा-या ११ लोकांवर रामनगर पोलीसांचा छापा. १२,०६,४४०/- रू. कि.चे जुगाराचे साहित्य जप्त.*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या जुगार खेळत व खेळवीत असणारे लोकांची माहिती काढून त्यांचेवर प्रभावी छापा घालून कारवाई करण्याबाबत च्या सूचना पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम पोलीस स्टेशन रामनगरचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना दिले होते.

त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती काढून रामनगर पो.स्टे. हद्दीतील समतानगर, तुकुम येथील राजेंद्र सोमाजी रायपुरे हा इसम त्याचे राहते घराचे पहिल्या मजल्यावरील खोलीत जुगार खेळत व खेळवीत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. पोलीसांनी त्यांचेवर दि. 20/10/2026 रोजी 16.50 वा. छापा घालून अवैधरित्या जुगार खेळणारे व खेळविणारे (1) शैलेश गंगाधर पोडल्लीवार वय-50 वर्षे, धंदा- नोकरी (शिक्षक जिल्हा परिषद) रा. छत्रपती नगर चंद्रपूर, (2) रंजु कालीदास दुर्योधन वय-54 वर्षे, काम-ऑटो चालक, राह. वैद्यनगर, मेजर गेट जवळ चंद्रपूर, (3) इंद्रजीत सोमाजी रायपुरे वय 58 वर्षे, काम-मजुरी, राह. तुकडोजी नगर तुकुम चंद्रपूर, (4) राजेंद्र सोमाजी रायपुरे वय- 53 वर्षे, राह मजुरी, राह. एसटी वर्कशॉप तुकुम चंद्रपूर, (5) राजेश्वर पोचम दुर्गे वय- 48 वर्षे, काम- नोकरी (डब्ल्युसीएल) रा. भिवापुर वॉर्ड गुरनुले वाडी चंद्रपूर, (6) लतीत उर्फ क्षितीज बाकाराम देशपांडे वय-48 वर्षे, काम- खाजगी नौकरी, राह. छत्रपती नगर तुकुम चंद्रपूर, (7) अनिल यशवंत बनकर वय 65 वर्षे, काम- रिटायर डब्ल्युसीएल, राह. सिनाळा, ता.जि. चंद्रपूर, (8) किशोर वसंता पारखी वय-49 वर्षे, काम नौकरी (डब्ल्युसीएल) राह. इंदीरानगर हनुमानमंदीर जवळ वार्ड नं. 03, चंद्रपूर, (9) सुनिल रामचंद्र नगराळे वय-63 वर्ष, काम- रिटायर डब्ल्युसीएल, राह. एसबीआय कॉलनी तुकुम चंद्रपूर, (10) संजु खुशाल दुर्योधन वय-38 वर्ष, काम- नौकरी (डब्ल्युसीएल) राह. डब्ल्युसीएल कॉलनी क्वाटर नं. एम-138 शक्तीनगर दुर्गापुर, चंद्रपूर (11) विजय गजानन रायपुरे वय-55 वर्ष, काम- नोकरी (डब्ल्युसीएल) राह. समता कॉलनी तुकुम चंद्रपूर यांना जागीच पकडून त्यांचे कब्जातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 12,06,440/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींविरूद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम- 04, 05 महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा नोंद केला आहे.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, मंगेश शेंडे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page