पिंपळगाव येथे भव्य बैलगाडा शर्यत संपन्न.
श्रेयश वानखेडे :
सेलू तालुक्यातील तिढी पिंपळगाव येथे जगदंबा देवी यात्रा तथा हनुमान जयंती निमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख पवन राजे घुमरे यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 41 हजार ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे ठेवण्यात आले होते व द्वितीय पारितोषिक रुपये 21 हजार रोख जगदंबा देवी संस्थान तर्फे ठेवण्यात आले होते तर तृतीय पारितोषिक रुपये 16000 माननीय प्रदीप घुमरे व अशोक भुमरे यांच्याकडून ठेवण्यात आले होते.सेलू तालुक्यात प्रथमच ठेवण्यात आलेल्या भव्य बैलगाडा स्पर्धेमध्ये दीडशे होऊन अधिक बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला. या बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहून पारंपारिक होणाऱ्या या खेळाचे शोभा वाढून कौतुक होऊ लागले.या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता म्हणून शिवशक्ती मित्र मंडळ व दुर्गेश जाधव यांचा लक्षा व पिस्तूल या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक श्रीमंत शिवशक्ती मित्र मंडळाच्या सिंघम व महाराज या बैल जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला. यानंतर खंडोबा प्रसन्न परभणी यांच्या सोन्या व मामा या बैल जोडीने तृतीय क्रमांक पटकावला. असे एकूण सात प्रकारचे बक्षीस या भव्य अशा बैलगाड्या शर्यतीची देण्यात आले होते या शर्यतीसाठी समालोचन संपत वाघमोडे व पंच म्हणून अनंत बापू ढवळे यांनी काम पाहिले य अतिशय शिस्तीत व शांततेत या बैलगाडा शर्यत संपन्न झाली.