Saturday, October 24, 2026
spot_img
HomePolice*रिक्षा चोरी करणाऱ्यास चोरलेल्या रिक्षासह ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल.*

*रिक्षा चोरी करणाऱ्यास चोरलेल्या रिक्षासह ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल.*

*रिक्षा चोरी करणाऱ्यास चोरलेल्या रिक्षासह ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल.*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. १६/१०/२०२६ रोजी रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान *तक्रारदार अनिल महादेव गुडे, वय ४५ वर्षे, रा. आंबेडकर नगर, बाबूपेठ, चंद्रपूर* यांनी त्यांच्या मालकीची तीन चाकी रिक्षा *क्र. MH-34 D 6963* ही जिल्हा परिषद, जवळी पेट्रोल पंपासमोर लावली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत रामनगर पोलीस स्टेशन येथे *अपराध क्र. ११९५/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता* नुसार गुन्हा दाखल केला होता.
रामनगर पोलिसांच्या शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली की, सदरची रिक्षा एक व्यक्ती *पालीवाल हॉस्पिटल, महाकाली मंदिर रोड* येथे घेऊन आहे.
पोलिसांनी तात्काळ तिथे जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव *शेख गफार रज्जाक शेख, वय ३५ वर्षे, रा. दुर्गानगर, ता. जि. चंद्रपूर* असे सांगून रिक्षा चोरीची कबुली दिली.
त्याच्याकडून चोरीला गेलेली *रु. ८०,०००/- किमतीची रिक्षा जप्त* करण्यात आली आहे. त्याच्याकडे तपास सुरू असून त्याच्याकडून अन्य अपराध उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी ही कारवाई केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page