Friday, June 5, 2026
HomeMaharashtraधान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करणार : कृषी...
spot_img

धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करणार : कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करणार : कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

सरसकट हेक्टरी 10 हजाराची मदत द्यावी : आ. सुधीर मुनगंटीवार
धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : सुधीर मुनगंटीवार

Shreyash Wankhede:

धान उत्पादक शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कृषी राज्यमंत्री ऍड आशिष जयस्वाल यांनी दिले.

आ सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत तारांकित प्रश्नावर विधानसभेत आज चर्चा झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रु हेक्टरी मदत देण्याची मागणी केली. यावेळी मदत देण्यासाठी अस्तित्वात असलेले विविध शासन निर्णय सभागृहासमोर ठेवत सोयाबीन उत्पादकांना येलो मोझ्याकने झालेल्या नुकसानाची भरपाई देताना जी पद्धत अवलंबिली तीच पद्धत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी वापरत नुकसान भरपाई देण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी रेटली.
दरम्यान पीक कापणी झाल्यामुळे पंचनामे होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी एक रुपये पीक विमा योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना देता येईल असे सांगितले. या उत्तराला हरकत घेत सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी पीक विमा लागू होत नसल्याचे सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात पीक विमा योजनेचे 73 कोटी रु. अद्याप अप्राप्त असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. हे अधिवेशन सुरु असे पर्यंत सर्व संसदीय आयुधांचा वापर करून आपण पाठपुरावा करू मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page